खेड : भरणे येथे मध्यवर्ती ठिकाणी अखेर गुरुवारपासून पोलिस चौकी कार्यान्वित झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी भागोजी औटी यांच्या हस्ते पोलिस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे भरणेतील बेशिस्त वाहतुकीला चाप बसण्यास मदत होणार आहे.
भरणे परिसर नेहमीच वाहनांसह पादचाऱ्यांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. यामुळे येथील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी मध्यवर्ती ठिकाणी पोलिस चौकी कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता. याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली आहे. या पोलिस चौकीत दोन कर्मचारी सेवा बजावणार आहेत. याप्रसंगी पोलिस निरीक्षक नितीन भोयर, सरपंच महेश गोवळकर, श्रीदेवी काळकाई देवस्थानचे अध्यक्ष महेश जगदाळे, सुनील चव्हाण, वाहतूक पोलिस घाणेकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 03/Feb/2025














