रत्नागिरी : मिरजोळेत तालुकास्तरीय नाट्य स्पर्धा

xr:d:DAF1aTVbgkI:8,j:5823564894037640794,t:23112802

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे येथील श्री माघी गणेशोत्सव मंडळ, पाडावेवाडी यांच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवादरम्यान रत्नागिरी तालुकास्तरीय नाट्य स्पर्धा आयोजनाबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवादरम्यान दररोज सायं. ७.०० वाजता श्रींची आरती कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी सायं. ४.०० वा. महिलांचे हळदीकुंकू, सायं. ८.०० ते ९.०० वा. भजन महिला मंडळ पाडावेवाडी, रात्री १०.०० वा. नाटक चांदणी (कलारंग, रत्नागिरी) आदी कार्यक्रम झाले.

सोमवार दि. ३ रोजी सायं. ८.०० ते ९.०० वा. भजन मधलीवाडी, मिरजोळे, रात्री १०.०० वा. नाटक नाटक गंध निशिगंधाचा (जुगाईदेवी आणि सुयोग कलामंच गावडेआंबेरे). मंगळवार दि. ४ रोजी सायं. ८.०० ते ९.०० वा. भजनः पाडावेवाडी, मिरजोळे, रात्री १०.०० वा. नाटक कडीपत्ता (कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ, कोतवडे), बुधवार दि. ५ रोजी सायं. ८.०० ते ९.०० वा. भजनः सोंबा रवळनाथ भजन मंडळ, बांबर, रात्री १०.०० वा. नाटक इष्काची इंगळी डसली (संकल्प कलामंच, रत्नागिरी), सादरीकरण होणार आहे.

गुरुवार दि. ६ रोजी सायं. ८.०० ते ९.०० वा. भजनः कालिकादेवी भजन मंडळ, पाडावेवाडी, रात्री १०.०० वा. नाटक नाती गोती (श्री सिद्धीविनायक कलामंच, रत्नागिरी). शुक्रवार दि. ७ रोजी सकाळी ११.०० वा. श्री सत्यनारायणाची महापुजा, दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, सायं. ८.०० ते ९.३० वा. बक्षीस वितरण सोहळा व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम. शनिवार दि. ८ रोजी सायं ४ ते ८ वा. श्रींची विसर्जन मिरवणूक होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 03/Feb/2025