रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी दोन संशयितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा. सुमारास घडली. अमान इमाम हुसेन मुल्ला (वय २४) आणि अर्शद राशीद खान (२५) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात इंझमाम अस्लम काझी (२१) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी दुपारी फिर्यादी हे भाट्ये बीच येथे गेले असताना दोन संशयितांनी त्यांच्या बॅगमधील ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेला. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 05/Feb/2025













