गुहागर : शिवसेना नेते, ठाकरे गटाचे विधानसभेचे गटनेते, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत साखरीआगरच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सकाळी ११ वा. होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी जि. प. सदस्या नेत्रा ठाकूर, तहसीलदार परिक्षीत पाटील, पं. स. गटविकास अधिकारी शेखर भिल्लारे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग गुहागरचे उपअभियंता संजय सलमाके, गुहागर तालुका मच्छिमार समिती विद्यमान अध्यक्ष महेश नाटेकर, गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत, जागा मालक अशोक मोहिते, अश्विता मोहिते उपस्थित राहाणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यानिमित्त सत्यनारायण महापूजा, हळदी-कुंकू समारंभ होणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 05/Feb/2025














