रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवीदारांनी चांगला प्रतिसाद दिला. संस्थेच्या एकूण ठेवी ३४१ कोटी १० लाखांच्या पुढे पोहोचल्या आहेत. नववर्ष स्वागत ठेव योजनेच्या सांगतेवेळी ११ कोटी ८६ लाखांच्या ठेवी नव्याने संस्थेकडे जमा झाल्याची माहिती संस्थाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ अखेरपर्यंत ४४ कोटींच्या ठेवी संस्थेकडे जमा झाल्या ठेवीदारांचा हा प्रतिसाद सर्व १७ शाखांमध्ये जाणवला. एक हजारापेक्षा जास्त ठेवखाती या योजनेत सुरू झाली. संस्थेने घोषित केलेल्या सर्व ठेव योजनांमध्ये ठेवीदारांनी भरभरून ठेव जमा केली.
संस्थेवरील ग्राहकांचा विश्वास आणि संस्थेबरोबरचे स्नेहमय नाते यांचे प्रत्यंतर ठेववृद्धीच्या प्रतिसादावरून दिसून येत असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. अर्थविश्वात प्रचंड कॅश क्रंच आहे, असे सर्वत्र बोलले जात असताना एक महिन्यात संस्थेकडे ११ कोटी ८६ लाखांची गुंतवणूक होणे लक्षणीय आहे, असे मत अॅड. पटवर्धन यांनी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 05/Feb/2025













