चिपळूण : कामगार कल्याण मंडळातर्फे आठ लाखांचे वितरण

चिपळूण : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात २६ हजार इतकी सर्वसाधारण सभासद नोंदणी झाली आहे. या मंडळाच्या शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, एमएससीआयटी, टंकलेखन व पाठ्यपुस्तक या योजनेंतर्गत ३०० सभासदांनी अर्ज सादर केले होते. तसेच गंभीर आजार सहाय्यता योजनेअंतर्गत २५ कामगार व १५ कामगार कुटुंबीयांना एकूण ८ लाख रुपये एनईएफटीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. या मंडळाच्या योजनेचा कामगारांना हातभार मिळत आहे.

याबाबतची माहिती कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड यांनी दिली आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून मंडळाने स्वतःचे www.public.mlwb.in हे पोर्टल सुरू केलेले आहे. तसेच महाकल्याण हे अॅप देखील विकसित करण्यात आलेले आहे. या मार्फत कामगार स्वतःसाठी व आपल्या पाल्यांसाठी मंडळाने जाहीर केलेल्या आर्थिक लाभाच्या योजना घरी बसून मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांनी मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन लाभघेण्यासाठी दिलेल्या मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 05/Feb/2025

Tata motars