रत्नागिरी : जल जीवन मिशनसंदर्भात कंत्राटदारांसोबत तालुकास्तरावर आढावा बैठक घ्याव्यात. तसेच महावितरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागांने समन्वय बैठक घेऊन प्रलंबित ५० नळपाणी योजना मार्गी लावाव्यात. कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा करू नये. जल जीवन मिशन प्रधानमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. याबद्दल तक्रारी येता कामा नयेत, याची दक्षता घ्यावी, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या आहेत.
महसुलची सर्व कार्यालये ई-ऑफिसमध्ये वर्ग झाली आहे. त्यामुळे महसूलचा कारभार समाधानकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त रत्नागिरीत आल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. कदम म्हणाले, ग्रामपंचायतीत किती ऑफलाईन आणि किती ऑनलाईन सेवा दिल्या जातात, याबाबतची तालुकानिहाय माहिती द्यावी. अपवादात्मक ठिकाणी ऑफलाईन सुविधा असावी. पीएम आवास योजना घरकुलाच्या संदर्भात एकाही व्यक्तीला वसुलीचे पत्र जायला नको. त्याला पुढचे हप्ते कसे मिळतील, यावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. कार्यालयांनी ई ऑफिस प्रणाली लागू करावी. पोलिसांनी एमपीडीएबाबतची कारवाई वाढवावी. योजना राबविण्यासाठी अधिकाऱ्यांचा पुढाकार हवा, असेही ते म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 05/Feb/2025














