संगमेश्वर : अंत्रवली-मालपपाडी येथे वणव्यात घरासह गोठा बेचिराख

संगमेश्वर : तालुक्यातील अंत्रवली-मालपपाडी येथे लागलेल्या वणव्यामुळे जरीना मोडक यांच्या घरासह गोठा बेचिराख झाला, आग लागल्याचे संमजताच स्थानिक ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी नसल्याने आग अधिकच भडकत होती.

या आगीची माहिती गावच्या तलाठी श्रीमती सुनीता पाटील यांना कळताच त्यांनी तत्काळ फणसवणे मंडल अधिकारी श्री. कदम यांना कळवले. कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांना आग आटोक्यात येत नाही असे समजताच त्यांनी अग्निशमन यंत्रणेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, संपर्क न झाल्याने मंडल अधिकारी श्री. कदम देवरूख येथे गेले आणि अग्निशमन गाडी सोबत घेऊन आले. त्यानंतर ग्रामस्थांसह अग्निशमन यंत्रणेने आगीवर नियंत्रण मिळण्यास यश आले.

मात्र, तोपर्यंत आगीत घर आणि गोठा पूर्ण बेचिराख झाला होता. मात्र, गोठ्यातील एका गायीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. आग आटोक्यासाठी हनीफ वलेले, रफिक वलेले, नासिर दसुरकर आदींसह ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 05/Feb/2025