खेड : तालुक्यात दऱ्याखोऱ्यातील दुर्गम भागात बहुतांश धनगरवाड्या वसलेल्या आहेत. पशुपालन हा समाजबांधवांचा प्रमुख व्यवसाय असून पिढ्यानपिढ्या याच व्यवसायावर कुटुंबांचा उदरनिर्वाह करत आहेत. गाई, म्हशी, शेळी पाळून दुध, दही, तूप विक्री करत मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाचा रहाटगाडा हाकत आहेत. मात्र पाळीव जनावरांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांचा पशुपालन व्यवसाय धोक्यात आला आहे.
प्राण्यांकडून शेतीचेही नुकसान होत असल्याने पाळीव जनावरांवर हल्ले करून शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. पाळीव जनावरांच्या नुकसानीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने धनगर समाजबांधवांचा पशुपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. बिबट्याच्या संचाराने ग्रामस्थ घरे बंद करून मुंबई, शहरात रोजगारासाठी भटकंती करत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. दिवसाढवळ्या ते हल्ले करत आहेत या मूळ शेतकऱ्यांना शेती करणेही अवघड झाले आहे. डुक्कर, माकडे, वानर व अन्य पक्षी शेतीचेही नुकसान करत आहेत. यामुळे अनेक गांवात लाखो हेक्टर शेती ओसाड पडली आहे. शेती व पशुपालन व्यवसाय व्यवसाय धोक्यात आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वनविभागाने ही बाब गांभिर्याने घेवून पाळीव प्राण्यांवर हल्ले करणाऱ्या बिबट्यासह वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 06/Feb/2025














