रत्नागिरी : शहरातील नवीन नळपाणी योजनेच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शहरातील माळनाका पुढारी भवनजवळ खोदाई करण्यात आली असून, खोदाई करताना काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याच्या खालून माती काढल्यामुळे भविष्यात काँक्रिटचा रस्ता खचण्याची शक्यता वाहनाचालकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.
शहरात सध्या कॉंक्रिटच्या रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. हा रस्ता होण्यापूर्वी नवीन जलवाहिनी आणि केबलॉगचे काम खोदाई करुन करण्यात आले होते. जलवाहिनीला मध्यंतरी वारंवार गळती लागत होती. सध्या गळतीचे प्रमाण कमी असले तरी अधूनमधून गळतीचे प्रकार होत आहेत. गुरुवारी शहरातील माळनाका येथील पुढारी भवनजवळ काँक्रीटच्या रस्त्याच्या बाजूने डांबरीकरण केलेल्या ठिकाणी खोदाई करुन पाईप लाईनचा तुकडा बदलण्यात आला. परंतु ही जलवाहिनी काँक्रीटीकरणाच्या खालून जात असल्याने एका बाजूने खोदाई करुन, काँक्रीटीकरणाच्या खाली मोठा खड्डा खणण्यात आला. आणि जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. परंतु काम झाल्यानंतर खड्डा ठेकेदाराकडून भरण्यातही येईल. परंतु त्याठिकाणी टाकण्यात आलेली माती वाहनाच्या येण्याजाण्यामुळे दबली जाऊन, त्याबरोबर काँक्रीटचा भागही खाली जाण्याची शक्यता वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे. अशा प्रकारे वारंवार खोदाई झाल्यास, शहरात चांगल्यापध्दतीने होत असलेले काँक्रीटीकरणाच्या रस्त्याचीही दुरावस्था होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 07/Feb/2025














