रत्नागिरी : खेड तालुक्यातील वेरळ रेल्वेस्टेशन समोरील पडक्या खोलित तीन पत्ती जुगार खेळ खेळणाऱ्या तिघांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. करण्यात आली.
अनंत शांताराम कोलगे (२९), संजय शांताराम पाटील (४६), शैलेश भिकू पाटील (४४) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस शिपाई तुषार झेंडे यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी तीन्ही संशयित मिळून जुगाराचे साहित्य आपल्या ताब्यात बाळगून तीन पत्ती पानाचा पत्त्याचा जुगार खेळ चालवत असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 07/Feb/2025














