रत्नागिरी : नवीन भाजी मार्केट इमारतीचे पाडकाम थांबले

रत्नागिरी : न्यायालयाने दिलासादायक निकाल दिला नसल्याने रत्नागिरी शहरातील नवीन भाजी मार्केटमधील गाळे रिकामे करून रत्नागिरी न.प.च्या ताब्यात दिले. काही गाळेधारक वीजबिल थकीत असल्याने महावितरणने त्या इमारतीतील गाळेधारकांचे वीज मीटर काढलेले नाहीत. त्यामुळे आता ही इमारत पाडण्याचे काम थांबवावे लागले आहे.

नवीन भाजी मार्केटची इमारत न.प. मालकीची आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक झाली असल्याचा अहवाल आल्यानंतर गाळेधारकांना नोटीस बजावून गाळे ताब्यात देण्यास सांगितले. या नोटीस विरूद्ध गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली. योग्य कायदेशीर कार्यवाहीशिवाय गाळे ताब्यात घेतले जावू नयेत, असा आदेश होण्यासाठी गाळेधारक न्यायालयात गेले होते.

न्यायालयाने या प्रकरणासंदर्भात गाळेधारकांना दिला दिला नाही. न्यायालयाने त्यांचा मागणी अर्ज फेटाळून लावल्यानंतर गाळेधारकांनी जागा मोकळ्या केल्या. काही पाडकाम झाल्यानंतर गाळेधारकांच्या वीज मीटरची अडचण निर्माण झाली. काही गाळेधारकांची वीजबिले भरलेली नसल्याने महावितरणकडून वीज मीटर काढण्यात चालढकल होवू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 07/Feb/2025