रत्नागिरी : शहरातील एकता नगर येथे गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग करताना स्थानिक गुन्हे अन्वेष्ण शाखेच्या पथकाने तीन संशयितांना तब्बल १ लाख ४५ हजार ७५० रुपयांच्या ब्राऊन हेरॉईन या अमली पदार्थासह ताब्यात घेतले. रउफ इक्बाल डॉगरकर (३५, रा. उर्दू स्कूलजवळ कर्ला, रत्नागिरी), नझीर अहमद मोहम्मद वस्ता (३८, रा. वस्ता मोहल्ला राजीवडा, रत्नागिरी) आणि राहिल अजीज सुवर्णदुर्गकर (२९, रा. राजीवडा बांध, रत्नागिरी) अशी ताब्यात घेतलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरफोड्या व चोऱ्यांना प्रतिबंध करण्याच्या तसेच अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करण्याबाबत पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलिस निरीक्षक नितिन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार करुन त्यामार्फत महत्त्वाच्या ठिकाणी पेट्रोलिंग सुरु केली होती.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोहलस हेड कॉस्टेबल शांताराम झोरे, विजय आंबेकर, दिवराज पाटील आणि विवेक रसाळ यांनी केली.
गस्त घालत असताना : गुरुवारी हे पथक शहर परिसरातून गस्त घालत असताना त्यांना एकता नगर येथे तीन संशयितांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. पोलिसांनी त्यांची चौकशी व तपासणी केली असता त्यांच्या त्याव्यातून ब्राऊन हेरॉईन या अमली पदार्थाच्या ४०५ पुड्या व इतर साहित्य असा एकूण १ लाख ४५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 08/Feb/2025














