गुहागर : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२५ – २६ साठी ८६०.२१ कोटीच्या मागणी आराखड्यास नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यामध्ये गुहागरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीबाबत नियोजन करावे असाही ठराव करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, खा. नारायण राणे, आ. प्रसाद लाड, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, आ. किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार आदी उपस्थित होते. पालकमंत्री ना. सामंत म्हणाले, प्रत्येक तालुकानिहाय जेटींचा प्रस्ताव तयार करुन द्यावा, अशा सूचना केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 08/Feb/2025














