राजापूर : राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने यावर्षी जल अंदाजपत्रक तयार करून पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. अशाप्रकारे जल अंदाजपत्रक तयार करणारी कळसवली ग्रामपंचायत तालुक्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
दरवर्षी आर्थिक अंदाजपत्रक तयार केले जाते त्याप्रमाणे पाण्याचासुद्धा जमा आणि खर्च ठेवायला हवा, या तत्त्वानुसार या जल अंदाजपत्रकामध्ये कळसवली ग्रामपंचायत अधिकारी सोनाली आराख यांनी अतिशय सखोल लेखाजोखा मांडला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात किती मिलीमीटर पाऊस पडला, त्यातील किती पाणी कसे व कुठे गेले आणि त्यातील शिल्लक पाण्यातून मानवाची गरज, पशुपक्ष्यांची गरज, शेतीसाठीची गरज तसेच उद्योगधंद्यांसाठी पाण्याची गरज एवढी गरज भागवून शिल्लक राहणारे पाणी आणि या शिल्लक पाण्याचा पुढील वापर व साठा अशा सर्व नोंदीनीयुक्त जल अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. प्रामपंचायत कळसवलीने माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत सहभाग घेतलेला असल्याने सिंगल युज प्लास्टिक बंदी, कृषी कचरा जळण्यावर बंदी, फटाके बंदी, लाऊडस्पीकर वापरावर निर्बंध, शांतताक्षेत्र घोषित करणे, असे ठराव करण्यात आले.
ग्रामसभेत चर्चा
हे जल अंदाजपत्रक ग्रामसभेपुढे ठेवण्यात आले. या जल अंदाजपत्रकापमाणे जल लेखापरीक्षणसुद्धा करण्यात आले. गावातील पाण्याचे नैसर्गिक आणि कृत्रिम जलसाठे किती, त्यामध्ये उपलब्ध पाणीसाठा किती व आपण किती पाणी वापरतो आणि त्यामध्ये आणखी पाणी वापरताना किती बचत करू शकतो, यांची सविस्तर चर्चा या ग्रामसभेत करण्यात आली, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत अडवण्यासाठी प्रत्येकाच्या शेतात जलतारा बांधणे, सांडपाण्यासाठी शोषखड्डे बांधणे, वैयक्तीक स्तराता रनवॉटर हार्वेस्टिंग बांधणे, सीसीटी बांधणे यावर काम करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
असा केला आराखडा
कळसवली गावात सद्यः स्थितीत नऊ सार्वजनिक विहिरी, एक सिमेंटबा मोठा बंधारा आणि पाच सार्वजनिक पाणी साठवण टाक्या आहेत. सहाः स्थितीतील पाणीसाठा व साधारण पावसाळ्यापर्यंत ग्रामस्थांची पाण्याची गरज याचबरोबर परिसरातील प्राणी, पक्षी व शेतीसाठी लागणारे पाणी याचाही या अंदाजपत्रकात विचार करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 08/Feb/2025














