स्टॅम्प पेपरबाबतच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी : शौकत मुकादम

चिपळूण : प्रतिज्ञापत्र करणे, शासकीय कामासाठी काही महत्त्वाचे अर्ज करणे, एखादी व्यक्ती महाराष्ट्रात राहत असेल व ती बेघर आहे, असे त्यांच्याकडून लिहून घेणे याकरीता शासन निर्णयाप्रमाणे अर्ज करून दहा रुपयांचे तिकीट लावून कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारायचे आहेत, असा शासनाचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.

काही शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये घरकुलासाठी तसेच अन्य काही कामासाठी पाचशे रुपयांचाच स्टॅम्प पेपर हवा आहे, अशी सक्ती केली जाते. हा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय केला जात आहे. संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासन निर्णयाची अमंलबजावणी होत आहे की नाही, याची पडताळणी करावी, अशी मागणी चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी संबंधितांना वेठीस धरू नये. शासन निर्णयाप्रमाणे जेथे आवश्यकता आहे, तेथेच पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर वापरला गेला पाहिजे. शासन निर्णयाप्रमाणे बहुतांशी अर्ज प्रतिज्ञापत्र, संमतीपत्र काही दाखले हे दहा रुपयाचे तिकीट लावून अर्ज स्वीकारले गेले पाहिजेत. पाचशे रुपयांचे स्टॅम्प पेपर सर्वसामान्यांच्या माथी मारू नयेत. या नियमाची तातडीने अंमलबजावणही करावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 10/Feb/2025