रत्नागिरी : २५ लाखांचे कर्ज देतो, अशी बतावणी करत फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे घेत त्याचीच तब्बल ३ लाख ५८ हजार १५३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, ही घटना २७ऑक्टोबर २०२४ पासून २३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडली.
ओमकार (पूर्ण नाव माहीत नाही) गुन्हा आणि गौरव संतोष मयेकर अशी गुन्हा दाखल केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात विष्णुदास बाबाजी ठाकूर (३४, रा. टीआरपी दोघांविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा अतुलित बलधाम जवळ, रत्नागिरी) यांनी रविवार, ९ फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, २७ ऑक्टोबर २०२४ रोजी फिर्यादी विष्णुदास ठाकूर यांनी एका वर्तमानपत्रामध्ये आलेली जाहिरात पाहून त्यातील एका संपर्क क्रमांकावर संपर्क केला. बिल्डिंग मटेरियलसाठी त्यांना २५ लाखांचे कर्ज हवे असल्याचे त्यांनी संशयितांना सांगितले. तेव्हा संशयित ओमकारने तुम्हाला कर्ज दिले जाईल, तुम्ही तुमची कागदपत्रे व्हॉटस्अॅप करून प्रोसेसिंग फी म्हणून १७ हजार ७५० रुपये जमा करा, असे सांगण्यात आले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने पैसे जमा केले.
त्यानंतर ओमकारने फिर्यादीला यातील संशयित गौरव मयेकर हा आमच्या संस्थेत कामाला आहे. त्याच्या मोबाईलवर संपर्क कर, असे सांगितले. फिर्यादीने मयेकरशी संपर्क केल्यावर त्याने फिर्यादीकडून कर्जाची रक्कम मिळण्यासाठी वेळोवेळी फी, शेअर्स खरेदी व अॅडव्हान्स हप्त्यासाठी रकमेची मागणी करत, एकूण ३ लाख ५८ हजार १५३ रुपये उकळले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 11/Feb/2025














