रत्नागिरी : रोटरी क्लब रत्नागिरी आणि इंटरॅक्ट क्लब ऑफ पोदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित आकाशदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे ४००हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि शुक्र, शनी, गुरू, मंगळ या चार ग्रहांचे तसेच चंद्राचे दुर्बिणीतून निरीक्षण करून आनंद लुटला. चार दुर्बिणी लावण्यात आल्या होत्या.
हा कार्यक्रम खगोल अभ्यासकेंद्र, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खगोलप्रेमी रत्नागिरी ग्रुप यांच्या सहकार्याने पार पडला. प्रारंभी प्रा. बाबासाहेब सुतार यांनी पॉवरपॉईंटद्वारे विश्वाच्या शोधात या विषयावर सुमारे अर्धा तास मनोरंजक व्याख्यान दिले तसेच आकाशाकडे पाहण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी ज्येष्ठ खगोल अभ्यासक सुहास गुर्जर यांनी पालकांशी संवाद साधला. कार्यक्रमाप्रसंगी रूपेश पेडणेकर, अॅड. मनीष नलावडे, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राकेश चव्हाण, झैनब लांबे आदी उपस्थित होते. खगोलप्रेमी रत्नागिरी ग्रुपचे कौस्तुभ पराडकर आणि त्यांचे सहकारी विनयकुमार आजगेकर आणि सम्यक हातखंबेकर यांनी दुर्बिणीतून ग्रहदर्शन घडवले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 12-02-2025












