चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथील आगवे ते वहाळ फाटा या सर्विस रोडवर मोटारसायकलवरून पडून एका विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पती रवींद्र यशवंत भुवड (रा. आगवे लिंबेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, या अपघातात पत्नी शर्मिला रवींद्र भुवड (४१, रा. आगवे) यांचा मृत्यू झाला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी रवींद्र भुवड हे आपल्या दुचाकीने पत्नी शर्मिला व मुलगी निधी (१४) यांना घेऊन आगवे ते सावर्डे रेल्वे स्टेशन असे सर्व्हस रोडने जात असताना मोटारसायकल वेगाने चालविल्याने अचानक त्यांची पत्नी मोटारसायकलवरून खाली पडली व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास सावर्डे पोलिस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 AM 13/Feb/2025














