चिपळूण : तालुक्यातील टेरव राधाकृष्णवाडी येथे एका पती-पत्नीला त्याच वाडीतील चौघांनी मिळून लाठा काठ्यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी चारजणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. शिवाजी रामचंद्र कदम (७३), सूरसिंग रामचंद्र कदम (७१) व दोन महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेरव राधाकृष्ण वाडी येथील जयवंत रामचंद्र कदम व जयश्री जयवंत कदम हे दोघे पती-पत्नी आपल्या घरात दरवाज्याला कुलूप लावून बसलेले असताना वरील चारही आरोपींनी हातात लाठ्याकाठ्या, फावडे घेऊन त्यांच्या घराच्या पाठीमागील सिमेंटचा दरवाजा टिकावने फोडला व घरात प्रवेश केला. यानंतर हातातील काठी, लोखंडी पाईपने या पती-पत्नीच्या डोक्यावर जोरदार मारहाण केली.
यामध्ये पत्नी जयश्री कदम या पुढे आल्या असता त्यांनादेखील लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेप्रकरणी चिपळूण पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 13/Feb/2025














