रत्नागिरी : हातीस गावातील पीर बाबरशेख यांच्या उरुसानिमित्ताने येथील संपर्क युनिक फाउंडेशनतर्फे रुग्ण सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
हातीस गावातील पीर बाबरशेख यांच्या उरुसानिमित्ताने लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.
अशा वेळी एखाद्या भाविकावर काही आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर त्याला तत्काळ मदत देण्यासाठी येथील संपर्क युनिक फाउंडेशनतर्फे रुग्ण सेवा केंद्र सुरू असते. ही सेवा गेली ७ वर्षे विनामूल्य अखंडपणे चालू आहे. यंदाही दोन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे.

या सेवा केंद्राचा शुभारंभ बाबरशेख ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर, डॉ. दिलीप नागवेकर, माजी अध्यक्ष तुषार नागवेकर, महेश कीर, नितीन शिवणकर, नरेंद्र नागवेकर आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या सेवेबाबत ग्रामस्थ मंडळाने संपर्क युनिक फाउंडेशनचे आभार मानले.
यावेळी संपर्क युनिक फाउंडेशनचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष जमीर खलफे, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे समाज सेवा अधीक्षक रेशम जाधव, पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, एस. टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उरुसासाठी येणाऱ्या भाविकांना काही मदत हवी असल्यास हातीस दर्ग्यासमोरील समोरील सेवा केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष शकील गवाणकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 13-02-2025














