देवरुख : शहरातील मराठा फाउंडेशन यांच्यावतीने शिवजयंती सोहळा २०२५ हा १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ रोजी सकाळी ९ वा. मराठा फाऊंडेशन, पोलीस ग्राउंड, देवरुख येथे सहभागी स्पर्धक किल्ला तयार करणार आहेत. याचे १७ रोजी सायंकाळी ६ वाजता सर्वांसाठी प्रदर्शन भरवले जाणार आहे.
दुर्गवीर प्रतिष्ठान किल्ला संवर्धन फोटो प्रदर्शन १७ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. याच दिनी सायंकाळी ६.३० वा. रस्सीखेच स्पर्धा महिला व पुरुष गटासाठी होणार आहे.
जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा प्रदर्शन दि. १८ रोजी सायंकाळी ६ वाजता. शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक दि. १८ रोजी सायंकाळी ६.३० ते ९ वा. बक्षीस वितरण व सत्कार रात्री ९ ते १० वाजेपर्यंत होणार आहे. शिवकालीन ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रम रात्री १० ते १२ वाजेपर्यंत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत, शिवजयंती सोहळा दि. १९ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून कार्यक्रम यात सायंकाळी ४ वा. मराठाभवन व शोभायात्रा काढली जाणार आहे. रात्री ८ वाजता मनोगत व्यक्त केले जाणार आहे. मशाल नृत्य व दीपोत्सव १९ रोजी रात्री ८ वाजता होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 13/Feb/2025













