राजापूर : वीजवापर नसतानाही तालुक्यातील आंगले वरची राऊतवाडी येथील एका ग्राहकाला महावितरणकडून अवाजवी बिल पाठवल्याचा प्रकार पुढे आला आहे. संबंधित ग्राहकाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अतिरिक्त बिल भरणे शक्य नाही तरी ते बिल रद्द करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी केली.
याबाबत निवेदन राऊत यांनी महावितरणच्या राजापूर कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे दिले आहे. राऊतवाडी येथील पांडुरंग गणू भोवड हे दोघे पती पत्नी राहत असून, त्यांचे घर लहान आणि वीजवापरही कमी आहे. तरीही महावितरणकडून त्यांना ८ हजार ८९० रुपये एवढे भरमसाट बिल पाठवण्यात आले आहे. याबाबत त्यांनी विचारणा केली असता महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युतबिल रक्कम कमी करून पुन्हा पाठवतो, तसेच रत्नागिरी येथिल विद्युत कार्यालयात इलेक्ट्रिक विद्युतमीटर तपासणीसाठी नेण्यात आले आहे.
मीटरमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे महावितरणकडून कळवण्यात आले आहे. मीटरमध्ये तांत्रिक बिघाड नसेल तर अवाजवी बिल कसे काय काढण्यात आले, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. भोवड यांचे अतिरिक्त बिल कमी करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 13/Feb/2025














