दापोली : हर्णे परिसरात १०० कुत्र्यांची नसबंदी

दापोली : हर्णे परिसरात मागील अनेक वर्षे भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हर्णे ग्रामपंचायतीतर्फे नसबंदी मोहीम राबवण्यात येत आहे.

कुत्र्यांची संख्या अधिक वाढल्याने कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिक, लहान मुले जखमी झाले आहेत. तीन व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे. नागरिकांच्या वाहनांचा पाठलाग करणे. झुंडीने अंगावर धावून येणे असे प्रकार हर्णैमधे सातत्याने वाढू लागले आहेत.

याबाबत हर्णे ग्राम पंचायतीने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलले आहे. पुणे येथील पेट फोर्स या संस्थेला पाचारण करण्यात आले होते. या संस्थेने मादी, नर या कुत्र्यांची नसबंदी यासह त्यांना अँटीरेबीज लस देखील टोचली आहे. जेणेकरून नागरिकांना विषबाधा होणार नाही. दोन दिवस चाललेल्या या मोहिमेत पेट फोर्सचे विनोद साळवी आणि टीम यांनी १०० कुत्र्यांची नसबंदी केली आहे. जवळपास ४५० ते ५०० कुत्र्यांची नसबंदी हे लक्ष ग्राम पंचायतीचे आहे.

या नसबंदीत एक कुत्र्यामागे किमान २००० हजार रुपये खर्च होतो. यासाठी लोक सहभाग मिळावा, असे आवाहन देखील ग्राम पंचायतीने केले होते.

कुत्र्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी दोन दिवसांत १०० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. उर्वरित मोहीम टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. – कृष्णा साळुंखे ग्रामविकास अधिकारी,

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 14/Feb/2025