दापोली एसटी स्टँड गल्ली, आझाद मैदान नशेचा अड्डा?

दापोली : दापोली एसटी स्टैंडलगत असणारी गल्ली आणि आझाद मैदान जणू नशेचा अड्डाच बनला आहे. सिगारेट, गुटखा याची तरुणांना बिनधास्त विक्री केली जात आहे. यात अनेक अल्पवयीन मुले देखील आहेत. रात्रीच्यावेळी आझाद मैदानात अन्य अमली पदार्थ देखील सेवन केले जातात, अशी चर्चा होत आहे.

त्यामुळे सुसंस्कृत दापोलीत चाललंय काय, असा सवाल दापोलीतील सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत.

या स्टँड गल्लीतून मोठी वर्दळ असते. त्यात महिला, लहान मुले यांची ये-जा असते. अशावेळी अनेकांना या धुराचा त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नका, असे नागरिकांनी सांगितले तर यावेळी वादाचे प्रसंग निर्माण होतात.

विडी, सिगारेट, गुटखा यातून व्यावसायिक दररोज हजारो रुपये कमवत आहेत. मात्र यातून तरुण पिढी दापोली या गल्लीतून सर्वसामान्यांना ये-जा करणे कठिण बनले आहे. नशेच्या अधीन होत आहे. याबाबत मात्र कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.

Sahyog multi.

त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येवर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 15/Feb/2025