रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये ठाकरे गट खाली होताना दिसत आहे. एकेक करून अनेक पदाधिकारी आता शिंदे गटात सामील होत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर असून आज मोठ्या संखेने ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण विधानसभा प्रमुख रोहन बने यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
आज तिघांचाही शिंदे गटात प्रवेश होणार असल्याने हि हकालपट्टी करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 15-02-2025












