खेड : रोहिदास समाज सेवा संघ ता. खेड या सामाजिक संघटनेतर्फे खेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम झाला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश शिरीषकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी श्री. रोहिदास महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संघाच्या कार्यकारिणी मंडळाच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली. नंतर संत शिरोमणी श्री रोहिदास महाराजांची आरती म्हणण्यात आली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष संतोष दयाळकर, कार्याध्यक्ष प्रकाश हेलगावकर, कोषाध्यक्ष प्रकाश इनरकर, संघटक परशुराम पेवेकर, सचिव सुभाष खोपकर, सहसंघटक विजय सुसविरकर, संघटक शंकर कदम, सहसचिव श्रीकांत देवळेकर, सहसचिव नारायण शिरकर, सदस्य सखाराम खेडेकर, गणेश शिरकर, विभाग प्रमुख संजीवन कदम, आनंदा कदम, महेश पेवेकर, रोशन बुतकर, नामदेव दयाळकर, राजेंद्र कदम, मनोहर दयाळकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 15/Feb/2025
