खेड आगाराच्या ३० बसेस होणार स्क्रॅप

खेड : खेड एसटी आगारातीलल अनेक बसफेऱ्यांमधील तांत्रिक बिघाडामुळे नियोजित फेऱ्या बसेसअभावी अचानक रद्द कराव्या लागत आहेत. पुढील दोन ते तीन वर्षात ३० हून अधिक कालबाह्य बसेस भंगारात काढण्यात येणार आहेत. यामुळे आगारातील बसेसची संख्या निम्म्यावर येणार असल्याने आगार व्यवस्थापनाच्या चिंतेत भर पडली आहे.

बसेसअभावी आधीच खासगी वाहतुकीमुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असताना नव्या समस्येचों भर पडणार असल्याने प्रवाशांचीही धाकधूक वाढली आहे. येथील बसस्थानकातून उशिराने मार्गस्थ होणाऱ्या बसफेऱ्यांमुळे प्रवाशांची रखडपट्टी कायम आहे. विविध मार्गावर रस्त्यात अचानक बंद पडणाऱ्या बसेससह नंद बसपाच्यांचा प्रवाशांना फटका चसत आहे. काही नादुरुस्त स्थितीतील परतीच्या बसफेऱ्या बसस्थानकात न जाता प्रवाशांना घेवून थेट आगारात जात असल्याने बसस्थानकातून सुटलेल्या फेऱ्या आगारात येवून बदलण्याची वेळ चालक वाहकांवर येत आहे. यामुळे प्रवाशांना आगाराबाहेर उभे राहून अन्य बसफेरीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

अपुन्या बसेसमुळे नियोजित मार्गावरील फेऱ्या रद्द झाल्याचे कारण देण्यात येत असल्यामुळे प्रवाशांना विशेषतः महिलांना खासगी वाहतुकीचा आधार घेत आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

आगारासाठी सद्यः स्थितीत ८५ गाड्या उपलब्ध असून यामध्ये ६४ साध्या गाड्या, ६ शिवशाही, ३ स्लीपर व ११ खासगी व १ आरटीओ बसचा समावेश आहे. यातील २० गाड्या आठ वर्षांच्या आतील, तर ५४ गाड्या दहा वर्षांवरील आहेत.

२०२३-२४ मध्ये ७ साध्या गाड्यांना १५ वर्षे लोटल्याने त्या कालबाह्य झाल्या आहेत. भंगारात काढलेल्या बसेसच्या जागी अन्य गाड्या अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यात येत्या २-३ वर्षात ३० हुन अधिक बसेसना १५ वर्षे होणार असल्याने त्या भंगारात काढल्या जाणार आहेत. आधीच स्क्रैप’ला काढलेल्या गाड्यांच्या जागी नवीन बसेस उपलब्ध झालेल्या नसतानाही कालबाह्य गाड्यांच्या बदल्यात नवीन बसेस कितपत उपलब्ध होतील, याबाबत सांशकता आहे.

मोठा परिणाम होणार नाही
यापूर्वी भंगारात निघालेल्या बसेसच्या बदली अन्य बसेस उपलब्ध झाल्या नसल्या तरी महामंडळाकडे लवकरच आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध होतील. पुढील काही वर्षात कालबाह्य ठरणाऱ्या काही बसेस कालबाह्य होणार असल्या तरी याचा मोठा परिणाम होणार नसल्याचे आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 17/Feb/2025