राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या जिल्हा मीडिया प्रमुखपदी जमालुद्दीन बंदरकर

आरवली : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल जिल्हा कार्यकारिणी सेक्रेटरी आणि मीडिया प्रमुखपदी ज्येष्ठ कार्यकर्ते जमालुद्दीन युसूफ बंदरकर यांची अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी जाहीर केली. चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते बंदरकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. जमालुद्दीन बंदरकर हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते निवृत्त प्राध्यापक असून त्यांचा सामाजिक, शैक्षणिक कार्याचा वसा आहे. त्यांचे अनेक विविध संस्थांशी संबंध आहेत. तसेच बंदरकर यांनी विविध संघटनांच्या पदांवर काम केले आहे.

आमदार शेखर निकम यांच्या शिफारसीनुसार जमालुद्दीन बंदरकर यांची जिल्हा कार्यकारिणीवर सेक्रेटरी तसेच मीडिया प्रमुखपदी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी नियुक्ती जाहीर केली आहे. जमालुद्दीन बंदरकर यांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन, सिद्दीक बेबल, शफी माद्रे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 17/Feb/2025