चिपळुणात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत : रणजीपटू भाविन ठक्कर

चिपळूण : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. चिपळूण पालिका, आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून त्यांनी पवन तलाव मैदानावर टर्फ विकेट तयार करून घेतली आहे. सिझन क्रिकेटला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. असोसिएशन आणि इथल्या खेळाडूंमध्ये पेंशन आहे. आता हे पेंशन तुमच्या गुणवत्तेच्या जोरावर पुढे न्या
आणि चिपळूणमधील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना दिसू देत, असे प्रतिपादन रणजीपटू भाविन ठक्कर यांनी येथे केले.

चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्यावतीने शहरातील पवन तलाव मैदानावर आमदार चषक राज्यस्तरीय सिशन बॉल क्रिकेट स्पर्धेचे उ‌द्घाटन भाविन ठक्कर यांच्या उपस्थितीत झाले. आमदार शेखर निकम यांनी कबड्डी, क्रिकेट, खो-खो, व्हॉलिबॉल अशा सर्वच खेळांसाठी सह‌कार्य राहील, असे सांगून आपल्या निधीतून पवन तलाव मैदानावर पॅव्हेलियन व अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. स्पर्धेच्या उद्घाटनाला सचिन कदम, अनिरुद्ध निकम, जयंद्रथ खताते, पूजा निकम, दीशा दाभोळकर, नितीन उसाळे, मुख्याधिकारी विशाल भोसले आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 17/Feb/2025