रत्नागिरी : वन विभागाने परदेशातील ॲडव्हेन्चर पार्कप्रमाणे आरेवारे येथे पर्यटनावर आधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून ५ कोटी निधी दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी काल विविध बैठका घेतल्या. बैठकीला उपवन संराक्षक गिरीजा देसाई, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे तांत्रिक सल्लागार सुनील देशमुख, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे आदी उपस्थित होते
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, वन पर्यटन, इको टुरिझम याबरोबरच वॉच टॉवर दुरुस्ती, वन भ्रमंती पोर्टल, आवश्यक असणाऱ्या बसेस, महिंद्रा जीप यासारख्या सुविधांवर वन विभागाने भर द्यावा. त्याचबरोबर जुवे जैतापूर येथे कांदळवन आधारित नियोजन करावे.
स्मार्ट सिटीबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि रत्नागिरी नगरपरिषदेने तातडीने नियोजन करून विकास कामांना सुरुवात करावी, असे सांगून पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, गटविकास अधिकारी यांची बैठक तहसिलदारांनी घ्यावी आणि मिऱ्या शिरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मार्गी लावावी. या योजनेसाठी ज्या ज्या गावांतून अडचणी येत आहेत, त्याबाबत संबंधित गावांच्या सरपंचांबरोबर बैठक घेवून त्यांना त्याची माहिती द्यावी. कोस्टल महामार्गबाबतही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून रेवस ते रेडी सागरी महामार्गावर होणाऱ्या पुलांची माहिती
१) रेवस ते कारंजा धरमतर खाडीवर चौपदरी मोठ्या खाडी पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. याची लांबी १०.२०९ किमी, ३ हजार ५७ कोटी प्रशासकीय मान्यता.
२) केळशी खाडीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम करणे ०.६७० किमी लांबी, १४८.४३ कोटी प्रशासकीय मान्यता,
३) आगरदंडा खाडीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम करणे ४.३१ किमी लांबी, प्रशासकीय मान्यता १३१५.१५ कोटी
४) कुंडलीका खाडीवरील रेवदंडा ते साळव पुलाचे बांधकाम करणे ३.८२९ किमी लांबी, प्रशासकीय मान्यता १७३६.७७ कोटी,
५) बाणकोट खाडीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम करणे १.७११ किमी लांबी, प्रशासकीय मान्यता ४०८.३४ कोटी
६) दाभोळ खाडीवर २ पदरी मोठ्या खाडी पुलाचे बांधकाम करणे २.८७६ किमी लांबी, ७९८.९० कोटी प्रशासकीय मान्यता.
७) जयगड खाडी पुलाचे बांधकाम करणे ४.३९१ किमी लांबा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:35 PM 17/Feb/2025
