चिपळूण : तालुक्यातील भिले गावची ग्रामदेवता महादेव, कालेश्वरी, भानोबा मंदिराचा अकरावा वर्धापन दिन सोहळा आज १८ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या निमित्त सकाळी ७ ते ८ या वेळेत देवीला अभिषेक, ८ ते ९ वा. पालखी सजविणे, १० वा. ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. अल्पोपहार, २ ते ३ वा. हळदी-कुंकू समारंभ, सायंकाळी ४ ते ५ वा. पालखी नृत्य, ५ ते ६ वा. हरिपाठ, ७ ते ९ वा. हभप भागवताचार्य कल्पेश महाराज चौधरी (जळगाव) यांचे कीर्तन, गायनाचार्य हभप ज्ञानेश्वर महाराज पांचाळ (परभणी), रात्री ९ ते १० वा. महाप्रसाद, रात्री ११ वा. त्रिमूर्ती नाट्य नमन मंडळ सामूहीक कलाग्रुप, चिपळूण यांचा नमनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 18/Feb/2025














