रत्नागिरी : पाडलेल्या भाजीमार्केट इमारत साहित्याचे ढिगारे ठेवण्याचा प्रश्न

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील नवीन आणि जुन्या भाजीमार्केटच्या इमारती पाडून झाल्या आहेत. परंतू पाडलेल्या इमारतींचे चिरे, दगड, सिमेंट काँक्रीटच्या तुकड्यांचा ढिग कुठे ठेवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रत्नागिरीतील नवीन आणि जुन्या भाजी मार्केटच्या इमारती फारच जीर्ण झाल्या होत्या. रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीच्या या दोन्ही इमारती नव्याने बांधण्याचे नियोजन करण्यात आले. गाळेधारकांनी भाजीमार्केटच्या दोन इमारती नगर परिषदेच्या ताब्यात दिल्यानंतर त्या जुन्या इमारतींचे पाडकाम सुरु झाले. प्रथम बाजारपेठेतील जुन्या भाजी मार्केटचे पाडकाम पूर्ण झाले. आता त्या ठिकाणचे सपाटीकरण केले जात आहे.

जुन्या भाजीमार्केटची इमारत बैठी आणि कौलारु असल्याने तेथील दगड, मातीचे ढिगारे जवळच्याच नगर परिषद शाळेजवळ ठेवता आले आहेत. परंतू नवीन भाजीमार्केटचे सर्व ढिगारे काँक्रीटच्या आणि मोठ्या प्रमाणात असल्याने ते कुठे ठेवायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 18/Feb/2025

Aayurzil