संगमेश्वर : हातीव क्र. १ शाळेचा रेखाकला परीक्षेत १०० टक्के निकाल

संगमेश्वर : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा हातीव क्र. १ चा रेखाकला परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. शाळेने एलिमेंट्री व इंटरमिजिएट या परीक्षेत १९ विद्यार्थी प्रविष्ट केले होते. ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये इंटरमिजिएट परीक्षेत एक विद्यार्थी ए ग्रेड, ५ विद्यार्थी व सी ग्रेड २ तर एलिमेंटरी परीक्षेत १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेने गेली पाच वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा अबाधित ठेवली आहे. या विद्यार्थ्यांना कला शिक्षक विनय होडे, मुख्याध्यापक सुनील करंबेळे यांनी मार्गदर्शन केले. रुपाली मांगले, गौरवी रावणंग, प्रगती ब्रीद, अरविंद बांबाडे, आर्या कोंडविलकर, पूनम पाटील यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सरपंच नंदकुमार कदम, शाळा समिती अध्यक्ष संदीप गावडे व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांचेकडून अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 18/Feb/2025