चिपळूण नगर परिषदेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागील ‘श्रीमंत’ शब्द अखेर हटविला

चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामागे छत्रपतीच्या नावामागे ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज’ असे नाव लिहिण्यात आले होते, परंतु यातील ‘श्रीमंत’ या शब्दावर मराठा क्रांती प्रतिष्ठानने हरकत घेतल्यानंतर चिपळूण नगर परिषदेने तातडीने कार्यवाही करत हा शब्द हटवला व ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे नाव ठेवले याबद्दल शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

चिपळूण शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा कोकणातील एक महत्त्वाचे आकर्षण आणि श्रद्धास्थान बनले आहे; मात्र नाव देताना अनावधानाने ‘श्रीमंत’ छत्रपती शिवाजी महाराज असे नाव देण्यात आले होते ही बाब अनेकांना खटकत होती. छत्रपतींच्या नावामागे ‘श्रीमंत’ हा शब्द कधीच आलेला नाही व इतिहासात सुद्धा या संदर्भातला दाखला नाही. त्यामुळे हा शब्द हटवण्यात यावा, अशी लेखी मागणी येथील मराठा क्रांती प्रतिष्ठान या नोंदणीकृत संस्थेने चिपळूण नगर परिषद प्रशासनाचे मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी विशाल भोसले यांच्याकडे केली.

मुख्याधिकारी भोसले यांनी तत्काळ हा शब्द हटवला शिवजयंतीच्या पूर्वी हा शब्द हटवल्या नंतर अनेक शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच मराठा क्रांती प्रतिष्ठानने मुख्याधिकारी विशाल भोसले यांचे आभार मानले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 19/Feb/2025