आ. शेखर निकम यांनी केली गाळ उपसा कामाची पाहणी

आरवली ः माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम सध्या सुरू आहे. माखजन बाजारपेठ येथे आ. शेखर निकम यांनी भेट देवून गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली.

गडनदीला दरवर्षी येणार्‍या पुरामुळे माखजन बाजारपेठ येथे पुराचे पाणी शिरते. गेली अनेक वर्षे नदी पात्रातील गाळ न काढल्याने पुराचे पाणी बाजरपेठेत शिरत असल्याने व्यापार्‍यांचे व ग्रामस्थांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. व्यापारी व ग्रामस्थ यांनी आ. शेखर निकम यांची भेट घेऊन यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. आ. निकम यांनी जिल्हा वार्षिक पूर नियंत्रण योजनेंतर्गत नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.

नदी पात्रातील गाळ काढण्याच्या या कामाबाबत आमदार शेखर निकम यांनी संबंधीत अधिकारी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून काही सूचना केल्या. पुरामुळे बाजारपेठ, व्यापारी व ग्रामस्थ यांचे होणारे नुकसान व त्यावरील उपाययोजना लक्षात घेत नदी पात्रातील गाळ काढल्याने पुराचा संभाव्य धोका टळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 19-02-2025

Arihant 2