रत्नागिरी : दक्षिणाभिमुख मारुती मंदिर येथे उद्या कीर्तनाचे आयोजन

रत्नागिरी : श्री गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून शहरातील मारुती आळी येथील श्री मारुती मंदिर संस्था व मेहेंदळे परिवार यांच्या वतीने गुरुवार २० रोजी सायंकाळी ५.३० वा. दक्षिणाभिमुख मारुती मंदिर येथे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शरदबुवा घाग यांचे कीर्तन होणार आहे. कीर्तन साथी करता विजय रानडे ऑर्गन, गौरव पाटणकर तबला साथ तर मंगेश चव्हाण पखवाज वादन करणार आहेत. कीर्तनप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 19/Feb/2025