रत्नागिरी : जिल्हास्तरीय संरक्षण समितीची आज मासिक बैठक

रत्नागिरी : माजी सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २४) रोजी सकाळी ११ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. माजी सैनिकांच्या कौटुंबिक संरक्षण संदर्भात तक्रारी असल्यास सदर बैठकीस विहीत वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 24/Feb/2025