संगमेश्वर : करजुवे, चिवेलीतून वाळूची बेकायदा तस्करी

संगमेश्वर : वाळू उत्खनन बंदी असताना शहरातील मुख्य रस्त्यावर व अंतर्गत मार्गावर जागोजागी वाळू डंपिंग’ केलेली पाहायला मिळत आहे. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे बेकायदा उत्खनन सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. येथूनच मोठ्या प्रमाणात वाळू चिपळुणात येत असताना तहसीलदार कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

चिवेली येथेही मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत असून, ही वाळू थेट खेडमधील पलांजेत उतरवली जात आहे. अनधिकृत वाळू व्यवसायामुळे शासनाचा महसूल बुडत असतानाही उत्खननाला परवानगी का दिली जात नाही, असा सवाल व्यावसायिकांसह सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.

महसूलने वाळूचे माहेरघर असलेल्या गोवळकोट व कालुस्ते येथे बेकायदा वाळू उत्खनन होऊ नये म्हणून पथके तैनात ठेवली आहेत. त्यामुळे वेधील उत्खनन पूर्णपणे थांबले असले, तरी त्याचा फायदा खाडीपट्ट‌धातील मालदोली, गांग्रई, चिवेलीतील काही व्यावसायिक घेत होते. या गावांमध्ये दिवस-रात्र वाळू व्यवसाय सुरू होता. मात्र आता, महसूलने वेथेही लक्ष घातल्याने केवळ चिवेली येथे उत्खनन सुरू असून बाजूच्या दररोज ७ ते ८ बोटी वाळू घेऊन थेट पलांजेत जाऊन उतरवत आहेत. दुसरीकडे संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथून दररोज वाळूच्या अनेक गाड्या येथे येत असल्याने शहरात चालूचे ढिगारे दिसत आहेत, त्यामुळे ढिगाऱ्यांवर महसूल व बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलीस का कारवाई करीत नाहीत, असा प्रश्र उपस्थित होत आहे.

जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडून धडक कारवाई
गेल्या काही वर्षांपासून ड्रेझर, हातपाटीने होणाऱ्या वाळू उत्यखननाला बंदी आहे. असे असताना मध्यंतरी काही राजकारण्यांचा आशीर्वाद व महसूलचे दुर्लक्ष यामुळे येथे सक्शन पंपासा हातपाटीचा व्यवसाय जोरदार सुरू होता. त्यातून तक्रारी झाल्याने काही महिन्यांपूर्वी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी येथे येऊन पंप फोडण्यापर्यंतची घड़क कारवाई केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 24/Feb/2025