चिपळूण : महाराष्ट्र राज्य परिवाहन माहमंडळाच्या एसटीला व चालकाला काळे फासण्याची घटना कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. तणावाच्या परिस्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून चिपळूण आगारातून सोडण्यात येणारी चिपळूण-बेळगाव एसटी कोल्हापूर एसटीच्या फेरीपर्यंत नेण्यात येत आहे.
शनिवारी (ता. २२) कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कर्नाटक रक्षक वेदिकेच्या कार्यकत्यांनी कोल्हापूर येथील एसटी व चालकाला काळे फसले. या घटनेविषयी महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे.
चिपळूण आगारातून बेळगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करीत असतात. तेथील प्रवाशांच्या सोयीसाठी चिपळूण पहाटे ५ आणि दुपारी ३ वाजता चिपळूण-बेळगाव एसटी सोडण्यात येते. याचा फायदा या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतो. दरम्यान, कर्नाटकात एसटी बसला काळे फासल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव एसटी बंद करत ती कोल्हापूरपर्यंत सोडण्यात येत आहे. परिणामी बेळगाव मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 24/Feb/2025














