दापोली : कलाक्षेत्राकडे नेहमी करिअर म्हणून पाहावे, असे मत वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट अँड डिझाईनचे रिटायर्ड डीन श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी दापोली येथे व्यक्त केले. ब्रिलियंट करिअर अकॅडमी, दापोली संचलित मराठा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल व श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल तसेच जेसीआय दापोली आणि रोटरी क्लब दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेचे दापोलीत आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या स्पर्धेत तब्बल ५६२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
३ ते ६, वयोगट ७ ते १०, वयोगट ११ ते १६ व वयोगट १७ पासून पुढे खुला गट या वयोगटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी मुख्य परीक्षक म्हणून श्रीकृष्ण कुलकर्णी होते तर सहपरीक्षक म्हणून विद्याधर ताम्हणकर होते. जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जे.सी. फराज रखांगे व सर्व सदस्य उपस्थित होते.
या स्पर्धेचे उत्तम नियोजन ब्रिलियंट करियर अॅकॅडमीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मिळून केले. या स्पर्धेमध्ये ३ ते ६ वयोगटामधून श्लोक कोलबांद्रेकर, अधीर खडसे, इरा मंडलिक यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला तर चिन्मय देवरुखकर, ज्ञानदा कुलकर्णी, आरोही सकपाळ यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. वयोगट ७ ते १० मधून राही कर्जीवकर, आरुषी कदम, शनाया बरजे यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला तर उमेर जसनाईक, मनस्वी कदम, श्रेया जाधव यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. ११ ते १६ मध्ये शिल्पा मेहता, गौतम कप्पटी, रुशदा भाक्षे यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले तर फातिमा पारकर, अंतरा कदम, पूर्वी झाटे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
वयोगट १७ ते पुढील खुल्या गटातून पूजा कवठे, वेदिका रेवाळे, अश्विनी सातारकर यांनी प्रथम, द्वितीय तर तृतीय क्रमांक पटकावला तर स्वप्नील शिंदे, सुजल भुवड, मुनज्जा डीमटीमकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 24/Feb/2025














