रत्नागिरी : २६ मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन

रत्नागिरी : मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल यांच्यामार्फत २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता दुसरा मजला, जी. पी. ओ. इमारत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे १३० व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेषतः महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. टपाल बँक वस्तू/मनीऑर्डर/बचत खाते/प्रमाणपत्र इत्यादीबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा, असे कळवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 25/Feb/2025