श्रवणदोष असणाऱ्यांसाठी रविवारी रत्नागिरीत मोफत तपासणी

रत्नागिरी : पवई (मुंबई) येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल आणि रत्नागिरीतील आस्था सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मतः व जन्मपश्चात श्रवणदोष असणाऱ्या किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या, बोलताना अडचण येणाऱ्या सर्व बालकांसाठी व त्यांच्या पालकांसाठी तसेच मोठ्या वयोगटांतील व्यक्तींच्या मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.

हे शिबिर रविवारी (२ मार्च) सकाळी १० ते ३ या वेळेत रत्नागिरीत आस्था थेरपी सेंटर (परकार हॉस्पिटलसमोर) येथे होईल.

शिबिरात श्रवण व वाचा दोषासंदर्भात तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या संदर्भ सेवा व त्यांच्या पालकांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. शिबिरात कान, नाक, घसा तज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण व ऑडिओलॉजिस्ट प्राजक्ता भोगटे या मुलांच्या ऐकण्या व बोलण्यासंदर्भातील समस्यांबाबत मार्गदर्शन करतील. शिबिराला येताना पालकांनी मुलांच्या पूर्वतपासणी रिपोर्ट सोबत आणावेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोणतेही श्रवण व वाचादोष असलेले बालक उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, लवकरात लवकर योग्य निदान होऊन बालके आवश्यक उपचारानंतर मुख्य प्रवाहात यावी यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे, असे आस्था दिव्यांग हेल्पलाइनचे प्रमुख समन्वयक व स्पीच थेरपीस्ट संकेत चाळके यांनी सांगितले.

Radhakrushna patapedhi

जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी त्यांच्या संपर्कातील अशा बालकांच्या पालकांना या शिबिराची माहिती द्यावी जेणेकरून कोणी सुटणार नाही, असे आवाहन आस्थाच्या सचिव व प्रकल्प संचालक श्रीम. सुरेखा पाथरे यांनी केले आहे. शिबिरासाठी नावनोंदणी पालकांनी १० ते ६ या वेळेत 9834440200 या क्रमांकावर करावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 26/Feb/2025