चिपळूणमधील गोरक्षक अनिकेत बापट यांचा प्रयागराजमध्ये विशेष सन्मान

चिपळूण : प्रयागराज येथे २० फेब्रुवारी रोजी विश्व हिंदू परिषदेच्या अखिल भारतीय गोरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विहिंपचे राष्ट्रीय प्रमुख दिनेश उपाध्याय, सर्व केंद्रीय पदाधिकारी व संत उपस्थित होते. गोरक्षण व संवर्धनासाठी विविध राज्यांमध्ये गोसेवा आयोगाच्या माध्यमातून काम करणाऱ्या चार राज्यांच्या अध्यक्षांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.

चिपळूणमधील गोरक्षक अनिकेत बापट यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. अनिकेत बापट हे २०१६ पासून शुद्ध कोकण कपिला वंश वृद्धी प्रकल्प, गोशाळा आदी क्षेत्रात कार्यरत आहेत. ते करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यामध्ये अनिकेत बापट यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 27/Feb/2025