कोंडगाव येथील अंगणवाडीत स्तनदा व गरोदर माता यांना देण्यात आलेल्या पोषक खाद्यच्या पॅकिंगमध्ये मेलेला उंदीर

साखरपा : महाराष्ट्र शासनातर्फे स्तनदा व गरोदर माता यांना देण्यात येणाऱ्या पोषक खाद्यच्या पॅकिंगमध्ये चक्क मेलेला उंदीर आढळला आहे. यामुळे गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी कोंडगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियांका जोयशी यांनी कोंडगाव मुरलीधर आळी येथील अंगणवाडी मध्ये संबंधित प्रकाराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेला याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर तालुका गटविकास अधिकारी यांना फोनवरून संपर्क करीत संबंधित घटनेची चौकशी करावी व जबाबदार एजन्सीवर कार्यवाही करावी असे सांगितले.

याविषयीं माहिती देताना सांगितले की, हा आमच्या गावातील नागरिकांच्या जीवाशी सुरु असलेला प्रकार अतिशय गंभीर असून यापढे हे खपवून घेतलं जाणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 03/Mar/2025

Tata harrier