रत्नागिरी : दिनांक २ मार्च रोजी सावंतवाडी येथे लायन्स इंटरनॅशनल च्या कोकण विभागाची विभागीय परिषद सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. विभागीय प्रमुख लायन गजानन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न झाली. एकूण १८ क्लब चा मिळून असा हा कोकण विभाग आहे.
या परिषदेत एकूण १८ क्लब मधे सदस्य संख्या ३० पेक्षा जास्त असलेल्या कॅटेगरी मध्ये सर्वाधिक पुरस्कार म्हणजेच तब्बल १६ लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी व लिओ क्लब ऑफ रत्नागिरी ला मिळाले.
यामध्ये माजी झोन चेअरमन लायन श्रेया केळकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व माजी अध्यक्ष लायन शिल्पा पानवलकर यांना क्लब एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विद्यमान अध्यक्ष लायन गणेश धुरी यांना बेस्ट प्रेसिडेंट,सचिव विशाल ढोकळे यांना बेस्ट सेक्रेटरी, खजिनदार अमेय विरकर यांना एक्सलंट ट्रेझरर,तसेच बेस्ट क्लब हे मानाचे सर्व पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याचबरोबर बेस्ट कॅबिनेट ऑफिसर म्हणून लायन सुनीलदत्त देसाई, एक्सलन्स परफॉर्मन्स म्हणून लायन पराग पानवलकर,लायन ओंकार फडके, नवीन सदस्य लायन शरद नागवेकर यांना प्रदान करण्यात आले. तसेच बेस्ट रिजन चेअरमन व्हिजीट चा पुरस्कार क्लबला देण्यात आला.
श्री लायन्स सन्मान लायन डॉक्टर संतोष बेडेकर,लायन सुधीर वणजू,हेल्पफूल पर्सनॅलिटी म्हणून लायन श्रेया केळकर यांनाही सन्मानित करण्यात आले.अध्यक्ष लायन गणेश धुरी यांना एम.जे.एफ.झाल्याबद्दल बहुप्रांतीय पिन देऊन सन्मानित करण्यात आले.
याच परिषदेत लिओ क्लब ऑफ रत्नागिरी ला सुद्धा मानाचे दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले.त्यामध्ये बेस्ट लिओ म्हणून लिओ श्रेयस रसाळ, बेस्ट सेक्रेटरी म्हणून लिओ गिरीजा घनवटकर यांना सन्मानित करत लिओ क्लब ऑफ रत्नागिरी चे काम कौतुकास्पद आहे असे नमुद करण्यात आले.
सावंतवाडी येथे पार पडलेल्या विभागीय परिषदेत लायन्स प्रांत 3234D1 चे प्रांतपाल लायन ॲड.एम.के.पाटील, उपप्रांतपाल लायन डॉक्टर विरेंद्र चिखले, विभागीय प्रमुख लायन गजानन नाईक,परिषद अध्यक्ष लायन संतोष चोडणकर, उपविभागीय प्रमुख लायन डॉक्टर निलेश पाटील, माजी प्रांतपाल लायन केशव फाटक, निर्माते जयू भाटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी च्या यशाबद्दल अभिनंदन केले व केलेल्या कार्याचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 04-03-2025














