संगमेश्वर : जंगलमय भागात गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्याविरोधात गुन्हा

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील अलेटीवाडी येथील जंगलमय भागात गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार २ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वा. सुमारास करण्यात आली. प्रभाकर गंगाराम चव्हाण (६६, रा. कळंबुशी अलेटीवाडी, संगमेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल गणेश पाटील यांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार संशयित हा रविवारी सायंकाळी अलेटीवाडी येथील जंगलमय भागात गावठी हातभट्टीची १ हजार रुपयांची १० लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 04/Mar/2025