खेड : तालुक्यातील पंधरागाव विभागातील काडवली गावातील गजवाडी येथे सार्वजनिक विहीर खोदायचे काम सुरू आहे. त्यासाठी जेसीबी यंत्र ठेवण्यात आली होती. शनिवार, दि. १ रोजी सायंकाळी ६ ते रविवार, दि.२ रोजी सकाळी ८.५० वाजण्याच्या मुदतीत या यंत्राचे सुमारे दहा लाख रुपये किमतीचे ब्रेकर मशिन अज्ञात चोरट्याने पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रल्हाद प्रकाश लाड (वय ४९, रा. कुरवळ खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 04/Mar/2025














