चिपळूण पालिकेवर अतिक्रमण हटवलेल्या विक्रेत्यांची धडक

चिपळूण : शहरातील किरकोळ व्यापाऱ्यांनी काल पालिकेवर धडक देऊन आम्हाला व्यवसाय करण्यासाठी जादा द्या. आमच्या व्यवसायावर तुम्ही कारवाई केली आत्ता आम्ही पोट कसे भरायचे? मुलांचे शिक्षण कसे करायचे? असे प्रश्न किरकोळ विक्रेत्यांनी विचारले. त्यावर पालिका जिथे जागा देईल तिथे व्यवसाय करा, अशी भूमिका मुख्याधिकारी भोसले यांनी मांडली.

गेल्या काही वर्षांपासून चिपळूण शहरातील भोगाळे, मध्यवर्ती २४ बसस्थानकासमोरील परिसर, ३ चिंचनाका (के.) अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलासमोरील परिसर, भाजीमंडई परिसर, बाजारपूल परिसर, पानगल्ली ठिकाणी अतिक्रमण झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत होता, याबाबत पालिकेकडे तक्रारी होत होत्या. अखेर त्यांची दखल घेत गेल्या दोन-चार दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या बेधडक कारवाईमुळे आता व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने सोमवारी या सर्वांनी पालिकेवर धडक देत आपले गाऱ्हाणे मांडले.

यावेळी बांगडी व्यवसाय करणाऱ्या महिलांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडताना आमची लहान मुले आहेत. आम्ही गरीब आहोत. गेले २५ ते ३० वर्ष गटारावर बसून आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहोत. आम्ही पैसे कमवले नाहीत, तर मुलांची शिक्षणे पूर्ण होणार नाहीत, कुटुंबाचे पोट कसे भरायचे, असे प्रश्न उपस्थित करत आम्हाला व्यवसाय करण्यासाठी जागा द्या, अशी मागणी केली.

मुख्याधिकारी भोसले यांनी या महिला व्यावसायिकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. पालिकेकडून जिथे जागा सुचवली जाईल तिथे आपण व्यवसाय करावा, असे स्पष्टपणे सांगितले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजीमंडई व मच्छी मटणमार्केट खुली करून या व्यावसायिकांसाठी पर्यायी जागेबाबत विचारविनिमय सुरू असून याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 04/Mar/2025