Devdedra Fadnavis : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया..

मुंबई : संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो काल समोर आले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी सुरु झाली. कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे.

सीआयडीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याच स्पष्ट झालय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आपल्या पीए मार्फत त्यांनी हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात माहिती दिली आहे. “आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. पुढील कारवाई करता हा राजीनामा राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारुन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

अजित पवार काय म्हणाले?

Ratnagiri Khabardar add image

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर विधान भवनाकडे निघालेल्या अजित पवार यांना पत्रकारांनी गाठलं. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. “तुम्हाला काहीही माहित नाही. उगाच काही प्रश्न मला विचारु नका. मी विधान भवनात चाललो आहे तिथे गेल्यावर सांगतो काय ते” असं अजित पवार म्हणाले. अजित पवार विधान भवनात आल्यानंतर ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 04-03-2025